पाऊल अन् टाचा हव्या एकदम फिट

आपलं पाऊल आणि टाच हे एका रेषेत एकमेकांशी जोडलेले असतात. त्यांच्या या रचनेत जरासासुद्धा बदल झाला तरी त्याचा आपल्या संपूर्ण शरीराच्या बायोमेपॅनिक्सवर परिणाम होऊ शकतो. अशा बदलामुळे शरीराची ठेवण आणि चालण्याची पद्धत बिघडू शकते. त्याचा परिणाम म्हणून शरीराचा एखादा भाग सतत ठणकत राहतो आणि मग त्या भागात व्यंगही येऊ शकतं.  यासाठीच ‘ऑर्थोफिट’ची स्थापना 1998 मध्ये झाली. आरोग्यसेवेतून समाजसेवा हे त्यामागचे उद्दीष्टय़ आहे.

गेल्या अनेक वर्षांच्या या प्रवासात ‘ऑर्थोफिट’ने पोडियाट्रीशी संबंधित म्हणजे साध्या शब्दांत सांगायचं झालं तर पाऊल आणि टाच आणि त्यांच्याशी निगडित बायोमेपॅनिक्सशी संबंधित आजारांवरच्या अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत.

‘ऑर्थोफिट’ चे प्रशिक्षित तज्ञ  पावलं, टाचा, चालण्याची ढब आणि शरीराची ठेवण यांच्याशी संबंधित आजार, गरजेनुसार रुग्णांच्या  सांध्यांना किंवा स्नायूंना दिला जाणारा कृत्रिम आधार (ऑर्थोटिक्स), त्यानुसार लागणारी पादत्राणे आणि मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या पायांची घ्यावी लागणारी काळजी यांसारख्या उपचार पद्धती समर्थपणे हाताळतात. तसेच पायांची काळजी घेण्यासाठी असणारी उत्पादने आणि साधनेही उपलब्ध करून दिली जातात.

त्याशिवाय लेझर थेरपी/औषधोपचार, वयोवृद्ध व्यक्तींना त्यांच्या शरीरात वयानुरूप होणाऱया बदलांना सामोरं जाताना लागणारी मदत, वैद्यकीय पेडिक्युअर, दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यात तंदुरुस्त राहण्यासाठी करण्याच्या व्यायामाचं प्रशिक्षण आणि क्रीडापटूंना लागणाऱया विविध उपचार पद्धतीही देतात. याचा लाभ कित्येकांनी घेतला आहे.

ऑर्थोफिटचे संस्थापक डॉ. चैतन्य शाह यांच्या परिश्रमांतून ऑर्थोफिटने यश संपादन केलं आहे. त्यांच्या मते, नुसत्या लक्षणांवर उपाय करण्यापेक्षा आजाराच्या मूळ कारणावर उपाय करण्यावर आमचा भर आहे. यातील बऱयाच दुखण्यांचे मूळ आपल्या तरुणपणात असते. याच काळात शारीरिक हालचाल, आहार याकडे लक्ष दिल्यास वयोमानानुसार होणाऱया समस्या कमी होतील.