पावसाळ्यात अधिकचे मनुष्यबळ, यंत्रणा तैनात करा

पावसाळा दीड महिन्यांवर येऊन ठेपल्याने पाकसाळापूर्व कामे वेगाने पूर्ण करावीत आणि पावसाळ्यात मुंबईकरांना कुठल्याही समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी पावसाळ्यात अधिकचे मनुष्यबळ यंत्रणा तैनात करा, असे निर्देश पालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दिले. पालिकेच्या 25 वॉर्डात सखोल स्वच्छता अभियान राबवण्यात आले, त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासह स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी सखोल स्वच्छता मोहीम सातत्याने व जोमाने सुरू राहणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शनिवारी ए विभागातील कुलाबा परिसरातील कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग येथून स्वच्छता मोहिमेस सुरूवात झाली. त्यानंतर सी विभागातील मुंबादेवी मंदीर परिसरात अग्यारी गल्ली येथे भेट देवून आयुक्तांनी स्कत: स्वच्छता कार्यात सहभाग घेतला. एच पश्चिम विभागात वांद्रे पश्चिममध्ये लीलावती रुग्णालय परिसर, एच पूर्व विभागात सांताक्रूझ पूर्व भागात प्रभात कॉलनी, एल विभागात साकी विहार रस्ता, एस विभागात हिरानंदानी जंक्शन या ठिकाणी गगराणी यांनी स्वच्छता मोहिमेतील कामांची पाहणी केली.