अमेरिकेनं लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा रशियाचा आरोप

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप असल्याचा रशियाचा दावा अमेरिकेने शुक्रवारी फेटाळून लावला.

परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले, ‘नाही, अर्थातच, आम्ही हिंदुस्थानातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करत नाही. आम्ही जगात कोठेही निवडणुकांमध्ये सहभागी होत नाही. इथले निर्णय हिंदुस्थानातील जनतेनं घ्यायचे आहेत’.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी अमेरिकेवर हिंदुस्थान आणि इतर देशांवर धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनाबाबत निराधार आरोप केल्याचा आरोप केल्यानंतर मिलर यांची प्रतिक्रिया आली आहे.

गेल्या वर्षी अमेरिकेच्या भूमीवर खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येच्या कटात हिंदुस्थानी गुप्तचर अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता.

‘युनायटेड स्टेट्सकडून नवी दिल्लीवर नियमितपणे निराधार आरोप… आम्ही पाहतो की ते केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर इतर अनेक राज्यांवरही निराधारपणे आरोप करतात… धार्मिक स्वातंत्र्यांचे उल्लंघन केल्याचा अमेरिकेच्या राष्ट्रीय मानसिकतेचा, ऐतिहासिक संदर्भाचा गैरसमज दिसून येतो. असा हस्तक्षेप हिंदुस्थानच्या विकास आणि एक देश म्हणून हिंदु्स्थानचा अनादर करण्यासारखा प्रकार आहे’, असं ते म्हणाले. झाखारोवा यांनी मॉस्को येथे पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.