बंगळुरूचा विजयी चौकार

पराभवाच्या षटकारानंतर बंगळुरूने विराट कोहलीच्या 92 धावांच्या जोरावर विजयी चौकार ठोकत पंजाब किंग्ज 60 धावांनी पराभव केला. आजच्या विजयामुळे बंगळुरू सातव्या क्रमांकावर पोहोचला तर पंजाब आयपीएलमधून बाद होणारा दुसरा अधिकृत संघ ठरला. आजच्या विजयामुळे बंगळुरूला प्ले ऑफची अंधुक आशा निर्माण झाली आहे.

आज कोहलीने पंजाबच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्याने 47 चेंडूंत 92 धावांची खेळी करत बंगळुरूला 7 बाद 241 अशी जबरदस्त धावसंख्या उभारून दिली. बंगळुरूला 250 पेक्षा अधिक धावांची अपेक्षा होती, पण शेवटच्या षटकांत हर्षल पटेलने 3 विकेट घेत केवळ 3 धावाच दिल्या आणि बंगळुरूचा संघ 241 वर थांबला. त्यामुळे 242 धावांचा पाठलाग करणारा पंजाबचा संघ फारच दबावाखाली होती. जॉनी बेअरस्टॉ (27) आणि शशांक सिंगने (37) रिली रोसॉच्या मदतीने पंजाबच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. रोसॉने बेअरस्टॉसह 65 धावांची तर शशांकबरोबर 36 धावांची भागी रचत संघाला 9 षटकांत 107 धावांपर्यंत नेले. रोसॉने 27 चेंडूंत 61 धावा चोपताना सामन्यात जान आणली होती. मात्र तो बाद झाल्यानंतर पंजाबच्या फलंदाजांचा गरबा सुरू झाला आणि त्यांचा संघ विजयाहून पराभवाच्या दरीत धडाधड कोसळत गेला. सिराजने 3 विकेट टिपत बंगळुरूला स्पर्धेतील विजय मिळवून दिला.

कोहलीच्या 634 धावा

कोहलीचा झंझावात आणि त्याला लाभलेली रजत पाटीदार (55), पॅमेरून ग्रीन (46) यांच्या साथीमुळे बंगळुरूने सहजपणे 241 अशी मजल मारली. त्याने आयपीएलच्या या मोसमात 600 धावांचा टप्पा गाठत के. एल. राहुलच्या चारवेळा 600 धावांच्या त्याने चारवेळा हा पराक्रम केला होता. कोहली 634 धावांसह ‘ऑरेंज पॅप’ घेऊन खेळतोय. त्याने आज आयपीएलच्या या मोसमातील आपली सर्वात वेगवान खेळी करताना 6 उत्तुंग षटकार आणि 7 चौकार ठोकण्याची करामात केली. त्याला आज शतकाचीही संधी होती, पण तो षटकार खेचण्यात अपयशी ठरला. आघाडीचे डय़ु प्लेसिस आणि जॅक्स हे दोघे लवकर बाद झाल्यानंतर रजत पाटीदारच्या 23 चेंडूंतील 6 षटकार आणि 3 चौकारांसह केलेल्या 55 धावांच्या खेळीने बंगळुरूच्या धावसंख्येला मोठी उंची गाठून दिली. त्याने 32 चेंडूंत 76 धावांची भागी रचल़ी