भंडारा जिल्हात तापमानाचा पारा 43 अंशांवर, वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण

भंडारा जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढलेला असून तापमान कमी व्हायला तयार नाही. परिणामी वाढत्या उकाड्यामुळे नागरिक अक्षरशः घामाघुम होत आहेत. सूर्य आग ओकत आहे. भंडारा जिल्ह्यात आज तापमान 43 अंश सेल्सिअसवर पोहोचले. यामुळे नागरिक उष्णतेमुळे हैराण झालेले आहेत.

मागील दोन ते तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात तापमानाच्या पारा वाढलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर कष्टकरी वर्गावर याचे परिणाम जाणवत आहेत. सकाळच्या वेळतेच मजूर वर्ग तसेच शहरातील नागरिकही सर्व कामे आटोपून घेण्यावर भर देत आहेत. तर दुपारी घरी आराम करत आहेत. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक काम असल्यास नाका तोंडावर रुमाल, स्कार्प बांधून नागरिक घराबाहेर पडत आहेत. उष्णतेमुळे बचाव व्हावा, या करिता नागरिक थंड पेयाकडे वळताना दिसून येत आहेत.