नवनीत राणांना भाजपचं तिकीट; उदयनराजे वेटिंगवरच

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपली सातवी यादी जाहीर केली या यादीत अमरावतीच्या चर्चित जागेवरून वादग्रस्त असणाऱया नवनीत राणा यांना भाजपने संधी दिली आहे, मात्र त्याचवेळी दिल्लीमध्ये साताऱयातून भाजपाची उमेदवारी मिळावी यासाठी ताटकळत बसलेल्या उदयनराजे भोसले यांना सातव्या यादीत देखील भाजपने स्थान दिलेले नाही, यावरून उदयनराजे समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नवनीत राणा यांच्या उमेदवारीला माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह स्थानिक भाजपने त्यांना कडाडून विरोध केला होता, मात्र हा विरोध डावलत भाजप श्रेष्ठाRनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केले. दुसरीकडे साताऱयातून भाजपची लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी ताटकळत दिल्लीत बसलेल्या उदयनराजे भोसले यांचा सातव्या यादीतदेखील समावेश झालेला नाही. त्यामुळे उदयनराजे यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता असून उदयनराजेंची उमेदवारी जाहीर होणार तरी कधी? असा प्रश्न समर्थकांमधून विचारला जात आहे. भाजपने आतापर्यंत 407 उमेदवारांची घोषणा केली आहे.