बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने घेतले शनि शिंगणापूरचे दर्शन

हिंदी सिनेमातील आघाडीची नायिका शिल्पा शेट्टी हिने रविवारी सायंकाळी शनि शिंगणापूरला येऊन शनि महाराजांचे दर्शन घेतले. चौथऱ्यावर जाऊन शिल्पा शेट्टी यांनी शनि मूर्तीला तेल अर्पण करून अभिषेक केला. शिल्पा शेट्टी या दरवर्षी न चुकता शनिशिंगणापूरला दर्शनासाठी हजेरी लावतात. यावेळी उदासी महाराज मठात त्यांनी पुरोहितांच्या हस्ते विधिवत अभिषेक केला. शिल्पा शेट्टी या शनि दरबारात आल्यानंतर चहात्यांनी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात देवस्थानच्या वतीने विश्वस्त आप्पा शेटे ,दीपक दरंदले व सायराम बानकर यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. इथे आल्यानंतर मनाला आत्मिक समाधान व मनाला ऊर्जा मिळते अश्या भावना व्यक्त केल्या.