दिल्ली अबकारी धोरण प्रकरण: BRS नेत्या के कविता यांच्या घरावर छापा

BRS-leader-K-Kavitha

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने बीआरएस नेत्या के कविता यांच्या हैदराबाद येथील घरावर छापा टाकला आहे. तपास यंत्रणेने जारी केलेल्या अनेक समन्सला उत्तर न दिल्यानं ही कारवाई झाली.

के कविता या तेलंगणामधील विधान परिषदेच्या (MLC) सदस्य आहेत आणि त्या भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत. यापूर्वी या प्रकरणात त्यांची चौकशी झाली असताना, त्यांनी यावर्षी किमान दोनवेळा समन्स टाळले आहेत.

रद्द केलेल्या दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील एक आरोपी अमित अरोरा याने चौकशीदरम्यान कविता यांचं नाव घेतलं होतं. तपास यंत्रणेने आरोप केला आहे की ‘साउथ ग्रुप’ नावाची एक मद्य लॉबी होती, ज्यांनी आणखी एक आरोपी विजय नायर यांच्यामार्फत आप नेत्यांना ₹ 100 कोटी दिले.

साउथ ग्रुपचा मास्टरमाईंड, कविता यांचा व्यावसायिक सहकारी असल्याचा आरोप आहे. बीआरएस नेत्या देखील या गटाचा भाग असल्याचं सांगितलं जात आहे.