चांद्रयान-3 निघाले चंद्राकडे

हिंदुस्थानच्या चांद्रयान-3 चा चंद्रप्रवासाचा अखेरचा टप्पा आता सुरू झाला आहे. पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणारे हे यान इंधनज्वलन प्रक्रियेतून मिळालेल्या धक्क्यामुळे पृथ्वीच्या कक्षेबाहेर गोफणीतील दगडाप्रमाणे भिरकावले गेले. हे यान चंद्राकडे प्रवास करू लागले आहे. 5 ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार असून 23 ऑगस्ट रोजी चंद्रभूमीवर सौम्य धक्का अवतरणाचा प्रयत्न ‘इस्रो’ करणार आहे.