घाटकोपरमध्ये शनिवारी महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन

मुंबई मराठी साहित्य संघ आणि पी. एन. दोशी वुमन्स कॉलेज, घाटकोपर पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने 15 वे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन, शनिवार 16 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी व लेखक प्रा. अशोक बागवे हे असून, उद्घाटक म्हणून पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते उपस्थित राहतील.

संमेलनाच्या समारंभात बाल साहित्य पुरस्कार सुरेश वांदिले यांना तर क्रीडा पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय साळवी यांना प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी चित्रकार विजयराज बोधनकर याची महाविद्यालयीन विद्यार्थी ‘चित्रांची भाषा’ या विषयावर मुलाखत घेतील. तसेच अमेय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया ‘आजच्या तरुण पिढीसमोरील आव्हाने’ या परिसंवादात महाविद्यालयीन विद्यार्थी भाग घेतील. कवी श्रीकांत पेटकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी कविता सादर करतील. या संमेलनास रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई मराठी साहित्य संघ आणि पी.एन. दोशी वुमन्स कॉलेजच्या वतीने अशोक बेंडखळे कार्यवाह, साहित्यशाखा यांनी केले आहे.