Lok Sabha Election 2024 : नरेंद्र मोदी अदृश्य मतदारांना घाबरतात, मल्लिकार्जुन खरगे यांचा निशाणा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘मागच्या काही दिवसांत मी दहा ते बारा राज्यांचा दौरा केला. या राज्यांमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मतदारांची फारशी चर्चा होत नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या ‘अदृश्य’ मतदारांची भिती वाटते’, अशी टीका खरगे यांनी केली. बुधवारी केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये जाहीर सभेत ते बोलत होते.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, ‘भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात काँग्रेसचे आता काही राहिले नाही तर, मग काँग्रेसला का घाबरतात”.

‘भाजपला आपल्या विजयाची इतकी खात्री आहेत तर, मग भ्रष्ट नेत्यांना पक्षात का घेताहेत? नरेंद्र मोदींना भ्रष्टाचार सहन होत नाही, मग तुम्ही आमदारांचा घोडेबाजार का केलाय? जोपर्यंत ते नेते काँग्रेस किंवा अन्य पक्षात असतात तोपर्यंत ते भ्रष्ट असतात. मात्र भाजपमध्ये गेल्यावर ते स्वच्छ होतात’, असा हल्लाबोल मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.