इराण-इस्रायलला जाणे टाळा

इराणकडून इस्रायलवर हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन हिंदुस्थानी सरकारने आपल्या नागरिकांना इराण आणि इस्रायलमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने दावा केला आहे की, इराण येत्या दोन दिवसांत इस्रायलवर हल्ला करू शकतो. त्यानंतर हिंदुस्थानी सरकारने हा अलर्ट जारी केला आहे. हल्ल्याची योजना इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्याशी शेअर केली गेली होती. त्याचवेळी, इस्रायल आपल्या उत्तर आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी इराणच्या हल्ल्याला तोंड देण्याची तयारी करत आहे, अशीही माहिती समोर आली आहे.