ज्या मुलीला या जगात आणलं, तिच्याचमुळे आई वडिलांनी संपवल जीवन

आई- वडिल आपल्या मुलांना मोठ्या कष्टाने वाढवतात. त्यांना उत्तम शिक्षण घेता यावे यासाठी कष्ट घेतात. त्यांना स्वकर्तृत्वावर जगायला शिकवतात. परंतु काही मुले स्वत:च्या स्वार्थासाठी पालकांच्या इच्छेचा त्याग करतात. केरळमधील कोल्लम जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. येथे महाविद्यालयात शिकत असणारी एक मुलगी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली आहे. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांनी याचा धस्का घेऊन आत्महत्या केली आहे.

केरळमधील महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. परंतु तिच्या घरच्यांना या प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तिला विरोध केला होता. हा मुलगा आपल्या मुलीसाठी योग्य नाही असा तिच्या पालकांना विश्वास होता. आई वडिलांचा आपल्या नात्याला विरोध आहे हे पाहून एक दिवस ती मुलगी प्रियकरासह घरातून पळून गेली. तिच्या जाण्यानंतर आई-वडील फार दु:खी झाले. त्यामुळे त्यांनी डिप्रेशनच्या गोळ्या घेण्यास सुरुवात केली. औषधांच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू झाला. कोल्लम जिल्ह्यातील पावुंबा येथील रहिवासी उन्नीकृष्ण पिल्लई आणि त्यांची पत्नी बिंदू पिल्लई अशी मृतांची नावे आहेत.

28 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरची आत्महत्या

गेल्या वर्षी केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये आत्महत्येची खळबळजनक घटना समोर आली होती. येथे एका 28 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरने आत्महत्या केली होती. लग्नासाठी पीडितेकडे प्रियकराने हुंड्याची मागणी केली होती. याच जाचाला कंटाळून तिने महाविद्यालयाजवळील भाड्याच्या घरात आत्महत्या केली. पोलिसांना सुसाईड नोटही सापडली होती. मृत शहाना ही तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजच्या शस्त्रक्रिया विभागात पीजीची विद्यार्थिनी होती.