स्वागत दिवाळी अंकांचे

कलामंच
यंदा ‘कलामंच’ या अंकाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. अंकाच्या मुखपृष्ठावर मराठी अभिनेत्री सायली संजीव हिचा पह्टो आहे. अंकामध्ये अनेक नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं आहे. हेमांगी नेरकर यांनी अंकाच्या सुरुवातीलाच आरती प्रभू यांच्या ‘एक शब्द’ या साहित्यिक पुस्तकाचे परीक्षण केले आहे. या अंकात प्रमोदिनी देशमुख यांनी ना.धों. महानोर यांनी लिहिलेला ‘हिरव्या बोलीचा शब्द’ हा लेख वाचनीय आहे. आरती प्रभू, सुवर्णी जाधव, प्रवीण दवणे, अशोक गुप्ते यांच्या कविता आहेत.
संपादिका – हेमांगी नेरकर
पृष्ठs – 164 किंमत – 100 रु.
सृजनसंवाद
‘सृजनसंवाद’ या दिवाळी अंकाचे हे तिसरे वर्ष आहे. प्रसिद्ध निरूपणकार धनश्री लेले यांनी आपल्या लेखातून संतवाङ्मयाचे दाखले देत त्यांनी ही संकल्पना स्पष्ट केली आहे. संशोधक डॉ. संजय जोशी यांनी मुंग्यांच्या वारुळाविषयी, वाळवीच्या घराविषयी लेख लिहिले आहेत. अभिनेत्री, लेखिका सुप्रिया विनोद ‘खऱयाहून खरं!’ या लेखात विविध नाटकांतील बदलते नेपथ्य आणि त्यात वावरताना आलेले अनुभव शब्दबद्ध केले आहेत. प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. नंदू मुलमुले यांचे ललित लेख हे खास आकर्षण आहे.
संपादक – गीतेश गजानन शिंदे
पृष्ठs- 188, किंमत – 300 रु.
एकमेव वेगळा
या अंकात साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक भान या अशा विविध क्षेत्रातील वेगळे प्रयोग तसेच वेगळे व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती यांच्यावर लेख आहेत. मराठी साहित्याच्या अभ्यासक मीना वैशंपायन यांनी आचार्य अत्रे यांच्यावरील ’हो, हो, तोच मी…’ या लेखांचे सादरीकरण केले आहे. सानिया यांचे मृत्यू या विषयावरील मनोगत व्यक्त करणारा लेख आहे, तसेच वंदना बोकील- कुलकर्णी, आशा साठे, गणेश मतकरी, वैशाली वैद्य यांचे मराठी भाषेतील त्यांच्या आवडीच्या साहित्यकृतींचा आस्वाद घेणारे लेख आहेत. गुरूचा महिमा सांगणारा स्मिता लेले यांचा लेख आहे. हा अंक विविध विषयांनी सजला आहे. चांद्रयान 3 चे सॉफ्ट लॅंडिंग या घटनेचे छायाचित्र दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर आहे.
संपादक – प्रकाश पानसे
पृष्ठs – 192, किंमत – 250 रु.