चांद्रयान-3 साठी लाँच पॅड बनवणारे इंजिनीअर्स 17 महिने पगारापासून वंचित; पैशांची मागणी करताच केंद्र सरकारचे हात वर

चांद्रयान-3 अंतराळात यशस्वीपणे झेपावल्यानंतर संपूर्ण हिंदुस्थानात एकच जल्लोष करण्यात आला. अनेक ठिकाणी फटाके पह्डून, तर काही ठिकाणी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला. हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिकासाठी हा क्षण अभिमानाचा ठरला. या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांवर देशभरातून काwतुकाचा वर्षावही करण्यात आला. परंतु, चांद्रयान-3 साठी लाँच पॅड बनवणाऱया इंजिनीअर्सना गेल्या 17 महिन्यांपासून पगारच मिळाला नाही, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

झारखंडच्या रांची येथील हेवी इंजिनीअर्स कॉर्पोरेशन (एचईसी) च्या इंजिनीअर्स यांना गेल्या 17 महिन्यांपासून पगार मिळाला नाही. इस्रोकडून मिळालेल्या ऑर्डरनंतर हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी इंजिनीअर्सनी कोणतीही कसर ठेवली नाही. या इंजिनीअर्संनी चांद्रयान-3 साठी लाँच पॅड, टॉवर व्रेन, पहल्डिंग कम व्हर्टिकली रिपोझिशन प्लॅटफॉर्म, स्लायडिंग डोअर, बोरिंग मशीनसह अन्य महत्त्वपूर्ण उपकरणे डिसेंबर 2022 च्या आत तयार करून इस्रोला दिली. वेळेच्या आत काम करूनही एचईसीचे जवळपास 2700 कर्मचारी आणि 450 अधिकारी पगारापासून वंचित राहिले आहेत.

चांद्रयान-3 चे प्रक्षेपण यशस्वी झाल्यानंतर इंजिनीअर सुभाष चंद्रा यांनी आनंद व्यक्त केला होता. एचईसी कर्मचाऱयांमुळे पुन्हा एकदा आपली मान अभिमानाने उंचावली आहे, असे त्यांनी म्हटले होते. या मोहिमेचा आपण एक भाग असल्याने आपल्याला आनंद होत आहे, असे म्हटले होते. या पंपनीने अवजड उद्योग मंत्रालयाकडे अनेकदा 1 हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतु, पेंद्र सरकारने कोणतीही मदत मिळू शकणार नाही, असे सांगत आपले हात वर केले. चांद्रयान-3 साठी जवळपास 600 कोटी रुपये खर्च आला आहे.

चांद्रयान-3 यशस्वीपणे दुसऱया कक्षेत

चांद्रयान-3 अंतराळात यशस्वीपणे झेपावल्यानंतर दमदार प्रवास सुरू आहे. चांद्रयान-3ने आज दुपारी दुसऱया कक्षेत यशस्वीरीत्या प्रवेश केला. आता चांद्रयान पृथ्वीपासून सर्वात दूर 42,603 कि.मी. आणि सर्वात जवळ 226 कि.मी.च्या कक्षेत फिरणार आहे. याआधी पहिल्या कक्षेत चांद्रयान 41,762 कि.मी. आणि सर्वात जवळ 173 कि.मी.च्या कक्षेत फिरत होते. चांद्रयान-3 आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून 14 जुलै रोजी यशस्वीपणे झेपावले आहे.