मराठी भाषा संवर्धनासाठी उद्योजकांचा पुढाकार

मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी तसेच अधिकाधिक मराठी उद्योजक तयार व्हावेत यासाठी षण्मुखानंद सभागृहात नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मराठी उद्योजकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

वृत्तपत्र विव्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले यांनी गेली अनेक वर्षे मराठी वर्तमानपत्र आजच्या तरुणांनी व विद्यार्थ्यांनी वाचावे यासाठी जनजागृती करत आहेत. या कार्यक्रमात सागर जोशी, गोरखनाथ पोळ, सुरेखा वाळके, डॉ.निलेश मानकर, राजश्री गायकवाड, राहुल माने यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच अनेक उद्योजकीय संस्थांचा सन्मान करण्यात आला. डॉ. अजित मराठे यांनी व्यवसायासाठी पैसा किती महत्त्वाचा आहे हे सांगितले तसेच बिपीन पोटे यांनी उद्योगातील आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करावा हे सांगितले. तसेच या कार्यक्रमात सागर जोशी, विनोद मेस्त्राr, शशिकांत खामकर, राजेश अथायडे, डॉ. रवी वैरागडे, पुंदन गुरव, ललित गांधी, पी. एन. शेट्टी, संतोष अंबावणे, राजेंद्र सावंत यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. यावेळी राजेश अथायडे, डॉ. अजित मराठे, डॉ. रवी वैरागडे, डी. एन. जाधव यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. समीरा गुजर-जोशी व किरण खोत यांनी हटके अंदाजात सूत्रसंचालन केले. निलेश मोरे, भालंचंद्र पाटे, संजय चौकेकर, हेमंत मोरे, संतोष पाटील, उदय सावंत व शिवशाहू प्रतिष्ठान अध्यक्ष रवींद्र देसाई यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.