Go First एअरलाइन्सची विक्री होणार! खरेदीदार 9 ऑगस्टपर्यंत लावू शकतात बोली

आर्थिक संकटाचा सामना करत असलेली एव्हिएशन कंपनी गो फर्स्ट आता विकण्याच्या मार्गावर दिसत आहे. कारण एअरलाइनची दिवाळखोरी प्रक्रिया हाताळणाऱ्या रिझोल्यूशन प्रोफेशनलने गो फर्स्टच्या विक्रीसाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट आमंत्रित केले आहे. गो फर्स्टच्या दिवाळखोरीसाठी नियुक्त केलेले IRP शैलेंद्र अजमेरा यांनी एका प्रेस जाहिरातीत सांगितले की, 9 ऑगस्ट 2023 पर्यंत इच्छुक उमेदवार एअरलाइनसाठी बोली लावू शकतात.

3 मे 2023 पासून Go First ची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमान कंपनी वाडिया समूहाच्या मालकीची आहे. आता कंपनी Go First साठी खरेदीदार शोधत आहे. यासाठी कंपन्यांकडून ईओआय मागविण्यात आले आहेत. इच्छुक कंपन्या 9 ऑगस्ट 2023 पर्यंत बोली लावू शकतात. यानंतर 19 ऑगस्ट 2023 पर्यंत निविदाधारकांची तात्पुरती यादी जारी केली जाईल, त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी या तात्पुरत्या यादीवर हरकती नोंदवता येतील.