गुजरात म्हणजे विकास, मुंबई विमानतळाजवळ लागले होर्डिंग्ज

सूरतची प्रगती झाली तर गुजरातची प्रगती होईल आणि गुजरातची प्रगती झाली तर माझ्या देशाची प्रगती होईल, असे धक्कादायक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली.

एकीकडे मोदींचे गुजरात प्रेम उफाळून येत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात येणारे सर्व मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात असूनही मिंधे सरकार शांत बसलेले आहे. आता मोदींच्या गुजरात प्रेमाचे पोस्टर देखील मुंबईत लागले लागले आहेत. ‘गुजरात म्हणजे विकास’ अशा आशयाचे पोस्टर मुंबई विमानतळावर लागले आहेत. यावरून नेटकरी देखील मिंधे सरकारवर भडकले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टरचा फोटो सोशल मीडियावरून शेअर करत मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘मुंबई विमानतळावरील हा फ्लेक्स.महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील सगळे उद्योगधंदे गुजरातला पळवून नेल्यावर गुजरात म्हणजे विकास हे बोलणं फार सोपं आहे..! यांचा विकास हा असाच नेहमी दुसऱ्यांच्या हक्कावर गदा आणूनच झाला आहे’, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.