नवरीवरून भर मंडपात राडा

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. परंतु आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे नवरीवरून भर मंडपात राडा पाहायला मिळाला. नवरीने तिच्या कुटुंबीयांवर लग्नमंडपातून किडनॅप केल्याचा आरोप केला आहे. मुलगी विजयवाडा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिकत होती. ती एका मुलाच्या प्रेमात पडली, नंतर दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. 13 एप्रिल रोजी विजयवाडा दुर्गा मंदिरात दोघांनी लग्न केले. मुलाने एका मुलीशी लग्न केल्याची माहिती मुलाच्या कुटुंबाला माहिती झाल्यानंतर त्यांनी लग्नाचा औपचारिक कार्यक्रम करायचे ठरवले. या लग्नात मुलीच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात आले होते. मुलीचे कुटुंबीय या लग्नावर खूश नव्हते. त्यामुळे त्यांनी लग्नाच्या कार्यक्रमाला पोहोचून मुलीला बळजबरीने आपल्या सोबत नेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुलीने तिच्या कुटुंबीयांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.