सावधान! देशात कोरोनाची नवीन 18 प्रकरणे

देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेले असून आता कोरोनाची 18 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे देशात एकूण 158 रुग्ण सक्रिय असल्याची नोंद आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार, देशात नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. देशात आतापर्यंत 4.50 कोटी कोरोनाची संख्या झाली आहे. तर कोरोनाने जीव गमावलेल्या लोकांची संख्या 5 लाख 33 हजार 292 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवार  आकडेवारीनुसार, हिंदुस्थानात 18 नवीन कोरोनाव्हायरस संसर्गाची नोंद झाली आहे, तर सक्रिय प्रकरणे 158 नोंदली गेली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळानुसार, आतापर्यंत कोविडने बरे होणाऱ्यांची संख्या वाढून 4,44, 68, 057 झाली आहे. तर राष्ट्रीय रिकव्हरी दर 98.81 टक्के आहे.मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशात आतापर्यंत कोविड लसीचे 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हिवाळा ऋतू सुरु झाल्यापासून कोरोनाची प्रकरणे समोर येऊ लागली. असं बोललं जातं की, हिवाळ्यात कोरोना व्हायरस वेगाने पसरतो. अशावेळी सावधान राहायला हवे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, घराबाहेर पडताना लावावे. हाताला हॅण्डवॉश, सॅनिटायझरचा वापर करावा.