‘चांद्रयान-3’ची तिसऱया कक्षेत यशस्वी झेप

हिंदुस्थानची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम ‘चांद्रयान-3’चे 14 जुलै रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. टप्प्याटप्प्याने हे चांद्रयान पृथ्वीपासून दूर जाईल. या चांद्रयानाचे मंगळवारी तिसरे ऑर्बिट मॅन्युव्हर यशस्वी झाले. म्हणजेच चांद्रयानाने तिसऱया कक्षेत यशस्वीपणे झेप घेतली. दरम्यान, 20 जुलै 2023 रोजी दुपारी 2 ते 3च्या दरम्यान चांद्रयान पुढच्या कक्षेत झेप घेईल असे ‘इस्रो’ अर्थात हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्थेने म्हटले आहे. 14 जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर दुसऱयाच दिवशी यानाने पहिली फेरी पूर्ण करून पहिले ऑर्बिट रेझिंग मॅन्युव्हर यशस्वीरीत्या पार केले होते. त्यानंतर 17 जुलै रोजी दुसऱया कक्षेत प्रवेश केला होता. त्यानंतर हे यान पृथ्वीपासून 41,603 बाय 226 किलोमीटर या कक्षेत पोहोचले. त्यानंतर मंगळवारी यान पुढच्या कक्षेत गेले.