खवले मांजराची तस्करी, 6 आरोपींना 17 फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी

खवले मांजराच्या तस्करीप्रकरणी वनविभागाने 7 जणांना ताब्यात घेतले आहे. यातील 6 जणांना वनकोठडी सुनावण्यात आली आहे. जुन्नर वन विभागातील घोडेगाव इथे खवले मांजराची तस्करी उघडकीस आली होती. खवले मांजर (इंडियन पँगोलीन) या शेड्युल 1 मधील वन्यप्राणी आहे.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान रोहीदास पंढरीनाथ कुळेकर वय 55 वर्ष, कांताराम सखाराम वाजे वय 49 वर्ष दोघे रा. भोमाळे (ता. खेड), सखाराम बबन मराडे वय 43 वर्ष, रा. पाभे (ता. खेड), सागर पुनाजी मेमाणे वय 31 वर्ष, रा. तळेराण (ता. जुन्नर), जालिंदर कान्डु कशाळे वय 65 वर्ष, रा. बडेश्वर (ता. मावळ), श्रीमती गीता नंदकुमार जगदाळे रा. चव्हाणवस्ती कुमठे (ता. कोरेगाव जि. सातारा), शांताराम सोमनाथ कुडेकर वय 32 वर्ष, रा. करंजाळे (ता. जुन्नर) असे एकूण 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी 6 आरोपीना अटक करुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडेगाव यांच्यासमोर हजर केले असता त्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी देण्यात आली आहे.

ही कार्यवाही पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रविण, जुन्नर वनविभागाचे उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा तथा सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर संदेश पाटील, घोडेगाव आणि खेड वनपरिक्षेत्र अधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आली.

वन व वन्यजीव तस्करी, अतिक्रमण, अवैध वृक्षतोड संबंधित गैरप्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाचा टोल फ्री नंबर 1926 या क्रमांकावर संर्पक साधून माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सहायक वनसंरक्षक श्री. पाटील यांनी केले आहे.