नर्गीस मोहमदी यांना शांततेचे नोबेल, 31 वर्षांचा तुरुंगवास आणि चाबकाचे 154 फटके

Activist-Narges-Mohammadi Nobel Peace Prize

इराणमधील महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱया आणि  गेली अनेक वर्षे  तुरुंगात खितपत पडलेल्या  मानवतावादी कार्यकर्त्या नर्गीस मोहमदी यांना यंदाचे शांततेचे नोबेल  जाहीर करण्यात आले आहे.  नर्गीस यांनी इराणी महिलांचे हक्क, लोकशाही यासाठी लढा देतानाच  मृत्युदंडाच्या शिक्षेविरुद्धही मोठी चळवळ उभी केली आहे.

महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने चळवळ उभारणाऱया नर्गीस यांना 13 वेळा अटक झाली असून पाच वेळा शिक्षा ठोठावली गेली आहे. त्यांना 31 वर्षांचा कारावास झाला आहे. इराणी राजवटीत असह्य छळाला सामोऱया गेलेल्या नर्गीस यांना चाबकाचे 154 फटकेही सहन करावे लागले आहेत. इराणमध्ये उभ्या केलेल्या महत्त्वाच्या चळवळीतील अजोड योगदानाबद्दल नर्गीस मोहमदी यांना शांततेचे नोबेल देऊन सन्मानित करण्यात येत असल्याचे नॉर्वेजियन नोबेल समितीने म्हटले आहे.