Lok Sabha Election 2024 : मतदान करा, रोपाची कुंडी घेऊन जा; लातुरातील स्तुत्य उपक्रम

 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात अपेक्षित मतदान झाले नाही. त्यामुळे आगामी टप्प्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. लातूर येथे मतदारांना रोपांची कुंडी भेट देण्यात येणार आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर शहर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रतील मतदान केंद्र क्रमांक 274 – पुरणमल लाहोटी शासकिय तंत्र निकेतन येथे ‘ग्रीन लातूर’ संकल्पनेवर आधारित मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. याठिकाणी विविध वनस्पतींची रोपे, त्यांचे माहिती फलक लावण्यात आले आहेत. या मतदान केंद्रांवर 963 मतदार असून मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराला रोपाची कुंडी देवून त्यांना वृक्ष लागवड व संवर्धनाचे आवाहन केले जाणार आहे.