ओटीटी प्लॉटफॉर्मवर आता मुंकेश अंबानी राज करण्याची शक्यता आहे. जिओ सिनेमाचे स्पर्धक असलेल्या डिस्ने हॉटस्टारची मालकी विकत घेणार आहे. त्यासंबंधी चर्चा सुरू असून डिस्ने हॉटस्टार हिंदुस्थानातील आपली मालकी जिओ सिनेमाला विकण्याची शक्यता आहे. देशात सध्या ओटीटी ऍप्स चांगलीच लोकप्रिय होत असून त्यात जिओ सिनेमानेही दमदार एन्ट्री केली. जिओ सिनेमा ऍपवरील बहुतांश व्हिडीओ विनामूल्य उपलब्ध आहेत. प्रीमियम व्हिडीओसाठी तीन महिन्यांसाठी केवळ 99 रुपये आकारण्यात येत आहेत. या वर्षीच्या आयपीएल सामन्यांचे आणि गेल्या वर्षी फिफा विश्वचषकाचे लाइव्ह स्ट्रीमिंग केल्यामुळे जिओची लोकप्रियता वाढली आहे. दरम्यान जिओ सिनेमाच्या आयपीएल सामन्यांच्या लाइव्ह स्ट्रिमिंगमुळे डिस्नेहॉटस्टारचे मोठे नुकसान झाले आहे, अशा परिस्थितीत डिस्ने प्लस हॉटस्टारने जिओ सिनेमाला टक्कर देत आशिया कप आणि वर्ल्ड कपचे स्ट्रीमिंगचे अधिकार विकत घेतले आहेत. पण युजर्सची संख्या वाढवण्यासाठी त्यांना मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग करावे लागत आहे.