निसर्गमैत्र – दाट सावलीचा करंज

अभय मिरजकर 

दाट सावली देणारा वृक्ष म्हणून करंजची ओळख आहे. रस्त्याच्या कडेला, बागेमध्ये सावलीसाठी म्हणून याची लागवड केली जाते. झाडाची सावली दाट असल्याने बाष्पीभवनाने जमिनीतील पाणी कमी होण्याची प्रािढया मंदावण्यास मदत होते. करंजाचे तेल विविध उपचारांसाठी वापरले जाते. या झाडाचे सर्व भाग औषधी आहेत. करंज ही वनस्पती लेग्युमिनोजी कुलातील असून तिचे शास्त्राrय नाव पाँगॅमिया पिनॅटा आहे. मूळची आशिया खंडातील ही वनस्पती उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशात वाढते. ही वनस्पती पडिक, रेताड, खडकाळ व निचऱयाच्या तसेच क्षारयुक्त जमिनीतही चांगली वाढते. पूर्ण वाढ झालेले करंजाचे झाड पूर व हिमपातही सहन करू शकते. करंजाच्या बियांपासून पिवळसर करडय़ा रंगाचे तेल मिळते. हे तेल खाण्यासाठी वापरले जात नाही, परंतु भिंतीला जो रंग दिला जातो त्यामध्ये याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे साबण व कीटकनाशके बनवण्यासाठी, कातडी कमावण्यासाठी तसेच वंगण म्हणून याचा वापर केला जातो.

बायोडिझेल किंवा डिझेलला पर्याय म्हणूनही या तेलाचा उपयोग आहे. यामध्ये अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. त्वचारोगामध्ये करंज तेलाचा वापर करण्यात येतो. खरूज, नायटे, पुरळ तसेच संधिवात, खोकला यासाठीही तेल वापरले जाते. करंजाच्या मुळाचा रस जखमा धुण्यासाठी तर गुरांना चारा म्हणून या झाडाची पाने वापरली जातात. त्याचप्रमाणे याचे चांगले खत तयार होते व या खतामुळे वाळवीचा उपद्रव कमी होतो. अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणून शासनाने करंजाची रोपे मोठय़ा प्रमाणात लावली होती.

करंज तेलामध्ये जंतुनाशक गुणधर्म आहे. सर्पदंश, कृमी व दूषित जखमा लवकर भरून येण्यासाठी करंज तेल वापरले जाते  व नंतर व्रणही राहत नाही. सोरायसिस, एक्झिमा या आजारांवर हे तेल नियमित लावले असता ते पूर्णपणे बरे होतात असे सांगितले जाते. कडुलिंबाच्या काडय़ांप्रमाणे करंजाच्या काडय़ांनीही दात स्वच्छ होतात. हिरडय़ा मजबूत होतात. मुका मार लागला असता तेथे पानांचा खल बांधला तर लाभ होतो.  लाकडाचा उपयोग घरांची बांधकामे, तेलाचे घाणे, गाडय़ाची चाके, जळण इत्यादींसाठी करण्यात येतो.

करंज तेल व कापूर किंवा लिंबाचा रस एकत्र करून खरूज झालेल्या ठिकाणी लावले तर लाभदायक आहे. करंज तेल व कडू सुरणाच्या फोडी एकत्र करून त्याचे तेल काढून ज्या ठिकाणी मुंग्या येतात त्या ठिकाणी लावले तर त्याचा लाभ होतो.