देशाच्या छाताडावर बसलेल्या मोदी राक्षसाला दूर करा, संजय राऊत यांचे आवाहन

लोकसभा निवडणुकीची लढाई ही देशाची लढाई आहे. ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र, मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, मोदी विरुद्ध शरद पवार, मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. ही लढाई बळवंत वानखेडे आणि नवनीत राणा या नाची, डान्सर, बबलीमधील नाही, अशी जोरदार टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज केली. देशाच्या छाताडावर मोदी नावाचा राक्षस बसलाय त्याला दूर करायचे असेल तर एकेक खासदार निवडून दिलाच पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

अमरावती मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारसभेत बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप आणि नवनीत राणांवरही सडकून टीका केली. नवनीत राणा यांचा नामोल्लेख न करता, ती नटी डोळा मारून तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करेल, पण सावध रहा असा इशाराही संजय राऊत यांनी अमरावतीकरांना दिला.

ज्या बाईने ‘मातोश्री’ला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. ‘मातोश्री’मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. ‘मातोश्री’विषयी अपशब्द वापरले. हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले. त्या बाईचा पराभव करणे हे शिवसेनेचे पहिले आणि नैतिक कर्तव्य असल्याचे संजय राऊत या वेळी म्हणाले. अशा बाईच्या पराभवात शिवसेनेचा मोठा वाटा असलाच पाहिजे, हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश असल्याचे लक्षात ठेवा, असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले.

n भाजपमध्ये गेले ते त्यांच्या चपला साफ करत बसले आहेत असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे व अजित पवारांवरही निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला अमित शहांच्या बंगल्यावर जातात, तेथील हिरवळीवर रुमाल टाकून दिवसभर बसतात आणि हात हलवत परत येतात, असे सांगतानाच भाजपने पुरोगामी महाराष्ट्राला नामर्द, षंढ बनवले आहे अशी टीकाही राऊत यांनी केली.

n प्रचारसभेपूर्की संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. उद्धक ठाकरे यांनी पुत्रप्रेमापोटी पक्षाकडे दुर्लक्ष केले आणि एकनाथ शिंदे यांना खोटय़ा प्रकरणांमध्ये अडककिण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांचा पक्ष फुटला, अशा उपमुख्यमंत्री देकेंद्र फडणकीस यांच्या टीकेकर याकेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘उपमुख्यमंत्री देकेंद्र फडणकीस यांच्यासारखा खोटारडा माणूस महाराष्ट्राच्या इतिहासात झालेला नाही. पुत्रप्रेम काय असते, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याबाबतीत अनेककेळा दिसून आले आहे. कल्याण-डोंबिकली मतदार संघामध्ये गोपाळ लांडगे या कडकट शिकसैनिकाची तिकीट कापून तेक्हा राजकारणातही नसलेल्या श्रीकांत शिंदे यांच्या उमेदकारीसाठी हट्ट धरणे याला पुत्रप्रेम म्हणतात, असे संजय राऊत म्हणाले.