विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता; मुंबईत निघणार घामाच्या धारा

राज्यात होळीनंतर उष्णता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्याप्रमाणे होळीनंतर या आठवड्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात पारा 40 अंशाच्या वर गेला आहे. या आठवड्यात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने मुंबईत उष्णतेसह घामाच्या धारा निघणार आहेत.

मुंबईसह राज्यात या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत पारा 35 अंशाच्या वर गेला असून राज्यात अनेक ठिकाणी 40 अंशापेक्षा जास्त तापमान आहे. त्यामुळे राज्यात दिवसा उन्हाचा चटका तर रात्री उकाडा जाणवत आहे. मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने या आठवड्यात मुंबईत उकाडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईसह कोकणाशिवाय राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. विदर्भात काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान 40 अंशांवर गेले आहे. ते सरासरी कमाल तापमानापेक्षा ३ ते ४ अंश सेल्सिअसने अधिक आहे. या आठवड्यात दिवसा उष्णतेची काहिली, तर रात्री उकाडा जाणवणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.