पत्नीचे विमान हुकल्याने केला अफवेचा फोन

मुंबई-बेंगलोर विमानात बॉम्ब ठेवल्याचा अफवेचा पह्न करणाऱयाला अखेर विमानतळ पोलिसांनी अटक केली. विलास रंगनाथ बाकडे असे त्याचे नाव आहे. पत्नीचे फ्लाईट मिस झाल्याने त्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार हे एका खासगी विमान पंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतात. ते विलेपार्ले येथील विमानतळावर कर्तव्यास आहे. गेल्या आठवडय़ात विमान पंपनीच्या कॉल सेंटरमध्ये एक फोन आला. मुंबईहून बंगलोरला जाणाऱया विमानात बॉम्ब असल्याचे सांगितले. त्या विमानात एकूण 167 प्रवासी होते. धमकीच्या पह्ननंतर याची माहिती विमानतळ पोलिसांना देण्यात आली. त्या माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) घटनास्थळी आले. तपासणी केल्यावर विमानात काही आक्षेपार्ह आढळून आले नाही. रात्री दीड वाजता विमान बेंगलोरच्या दिशेने रवाना झाले. सुरक्षा अधिकाऱयाने दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

सहाय्यक आयुक्त श्रीराम कोरेगावकर यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक मधुकर सानप यांच्या पथकातील अधिकाऱयाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना ज्या नंबरवरून पह्न आला त्याची माहिती मिळाली. पह्न करणारा हा बेंगलोरला असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी विलासला चौकशीसाठी मुंबईत बोलावले. कसून चौकशी केल्यावर त्याने फोन केल्याची कबुली दिली. गेल्या आठवडय़ात विलासची पत्नी कामानिमित्त मुंबईत आली होती. ती पुन्हा विमानाने बेंगलोरला जात होती. तिची फ्लाईट चुकल्याने तिने याची माहिती विलासला दिली. विलासने पंपनीच्या ग्राहक सेवा कक्षात पह्न करून विनंतीदेखील केली. विमान थांबेल या आशेने त्याने तो पह्न केल्याचे तपासात समोर आले आहे.