गावातील मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून वडीलांनी केली मुलीची हत्या

उत्तर प्रदेश येथे मुझफ्फरनगरमधील सिखेडा पोलिस स्थानक परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने मुलीचे गावातील तरूणासोबत संबंध असल्याच्या संशंयावरून 20 वर्षांच्या मुलीची गळा चिरून हत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी वडिल व मुलीमध्ये जोरदार वाद झाले. त्याचवेळी वडीलांनी रागाच्या भरात मुलीचा गळा चिरून खून केला. ‘मुलगी गावात आपले व कुटुंबाचे नाव खराब करत असल्याने तिला मारून टाकले’ असे वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या जवाबात म्हटले आहे.

आरोपीची मुलगी व तिचा प्रियकर हे एकाच जातीचे असल्याने, हा जातीवादावरून केलेला गुन्हा नसल्याचे प्राथमिक तपासात समजले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.