मोदी लक्ष विचलित करतात आणि अदानी खिसे कापण्याचं काम करताहेत! नाशिकमध्ये राहुल गांधींचा हल्ला

अदानींसारख्या उद्योगपतींकडून देशाची लूट सुरू आहे. गरीबांचे खिसे कापले जात आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेचे लक्ष विचलित करीत आहेत. कोणी काही बोललेच तर गृहमंत्री अमित शहा सीबीआय, ईडी, इन्कमटॅक्सचा दंडा घेऊन उभेच आहेत, असा हल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चांदवड आणि नाशिक येथील इंडिया आघाडीच्या शेतकरी संवाद सभेतून केला.

या सरकारकडून अब्जाधीशांचे कर्ज माफ केले गेले. मग शेतकऱयांचे कर्ज माफ का नाही होऊ शकत, असा सवालही त्यांनी केला. शेतमालाला आधारभूत पिंमत देऊ, शेतकऱयांना जीएसटीमुक्त करू आदी घोषणा त्यांनी केल्या. नाशिकमध्ये राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा झंझावात पाहायला मिळाला. रोड शोला तुफान गर्दी उसळली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

अदानींसारख्या उद्योगपतींकडून देशाची लूट सुरू आहे. गरिबांचे खिसे कापले जात आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेचे लक्ष विचलित करीत आहेत. कोणी काही बोललेच तर गृहमंत्री अमित शाह सीबीआय, ईडी, इन्कमटॅक्सचा दांडा घेऊन उभेच आहेत, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला. या सरकारकडून अब्जाधीशांचे कर्ज माफ केले गेले. मग शेतकऱयांचे कर्ज माफ का नाही होऊ शकत, असा सवालही त्यांनी केला. शेतीमालाला आधारभूत पिंमत देऊ, शेतकऱयांना जीएसटीमुक्त करू, आदी घोषणा त्यांनी केल्या.

भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने चांदवड येथे इंडिया आघाडीच्या शेतकरी संवाद सभेत आणि नाशिकच्या शालिमार चौकात गुरुवारी झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. नाशिकमध्ये त्यांनी पेंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला. दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक आणि सर्वसाधारण गरीब अशा नव्वद टक्के लोकांवर हे सरकार अन्याय करतंय. अदानी, अंबानी एखाद्या वस्तूवर जेवढा जीएसटी भरतात तेवढाच जीएसटी सर्वसामान्यांनाही द्यावा लागतो. जमिनी मात्र सर्वसामान्यांच्या संपादीत केल्या जातात. अदानी, अंबानींसारख्या उद्योगपतींच्या जमिनी संपादीत झाल्या नाहीत.
चांदवड येथे विराट सभेला संबोधित करताना सर्वप्रथम राहुल गांधी यांनी ‘रामराम मंडळी’ अशी मराठीतून साद घातली. दहा वर्षांच्या सत्ताकाळात नरेंद्र मोदी यांनी देश चालवणाऱया अन्नदात्यांचे रक्षण केले नाही. वीस-पंचवीस अब्जाधीशांचे मात्र सोळा लाख कोटींचे कर्ज माफ केले. मग, शेतकऱयांचे कर्ज का माफ होऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी केला. भाजपाच्या हुकूमशाही कारभाराचा समाचार घेतला. देशात शेतकऱयांच्या समस्या, बेरोजगारी, महागाई, अग्नीवीर असे गंभीर प्रश्न असताना मीडिया मात्र चोवीस तास नरेंद्र मोदी यांचाच चेहरा दाखवते. काही अब्जाधीशांसाठी जनतेचे लक्ष दुसऱयाच गोष्टींवर खिळवून ठेवण्याचे काम ते करीत असल्याची टीका त्यांनी केली.

तुमच्यासाठी आमचे दरवाजे कायम खुले

इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱयांचे कर्ज माफ करणार, शेतीमालाला स्वामिनाथन आयोगानुसार किमान आधारभूत पिंमत मिळवून देणार, पीक विमा योजनेची पुनर्रचना करून शेतकऱयांचे हित जपणार, शेतमालाच्या दराची काळजी घेणारे आयात-निर्यातीचे धोरण ठरवणार, शेतकऱयाला जीएसटीमुक्त करण्याचे प्रयत्न करणार, असे आश्वासन दिले. तुमच्यासाठी आमचे दरवाजे कायम खुले असतील, असेही राहुल गांधी म्हणाले.

कांदा उत्पादकांचा टाहो

चांदवडच्या सभेच्या सुरुवातीलाच तीन शेतकऱयांनी कांदा उत्पादकांना सरकारने कसे उद्ध्वस्त केले ही व्यथा मांडली. निर्यातबंदीमुळे एका रात्रीतून कांद्याचा क्विंटलचा भाव साडेचार हजार रुपयांवरून अठराशेवर कोसळला. सरकारने आमचे हाल-हाल केले असे सांगताना शेतकऱयाने टाहो पह्डला. महाविकास आघाडीने आम्हाला मदत करावी, असे आवाहन केले.

शेतकऱयांचे दुःख जाणून घेण्यासाठी सरकारकडे वेळ नाही

सीमेवर देशाचे रक्षण करणाऱया जवानांवर अग्नीवीर योजनेच्या माध्यमातून अन्याय केला, त्याचप्रमाणे देशाच्या आत संरक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱया शेतकऱयांचेही प्रचंड हाल केले. चहुबाजूने त्यांना संकटात ढकलले. शेतकऱयांवर जीएसटी लावला. पीकविमा योजनेच्या माध्यमातून फक्त पंपन्यांचेच भले केले. किमान आधारभूत पिंमत लागू न करण्याची भूमिका घेतली. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कित्येक दिवस थांबून होते. आता रामलीला मैदानात ते आंदोलन करत आहेत. त्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी सरकारकडे अजिबात वेळ नाही. जोपर्यंत तुम्ही शेतकऱयांचा सन्मान करत नाही, तोपर्यंत त्यांची मदत करू शकत नाही, हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे.

मोदी तो गयो.. ही ‘भारत जोडो’ची गॅरंटी

भारत जोडो न्याय यात्रेत देशभरातील जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन विचार मांडले. मोदी तो गयो… अर्थात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही, हीच या यात्रेने गॅरंटी दिली आहे. ही परिवर्तनाची नांदी आहे, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. काँग्रेस नेते राहुल गांधी नवा प्रकाश घेऊन ही यात्रा करीत आहेत. हजारो किलोमीटरच्या या प्रवासात त्यांनी सामान्य जनतेचे म्हणणे ऐकले. मोदी तो गयो, अमित शाह गयो, सब चोर-लफंगे गये, ही गॅरंटी यात्रेने दिली आहे, असे ते म्हणाले.

मोदी सरकार हटवणं हेच आपलं काम

शेतकरीविरोधी धोरण राबवणाऱया, महागाई आणि बेरोजगारीला निमंत्रण देणारे मोदी सरकारला हटवणं हेच तुमचं-आमचं काम आहे. आपली सामुदायीक शक्ती उभी करून देशात परिवर्तन घडवून आणण्याची शपथ घेऊ या, अशी भावनिक साद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घातली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील तरुण पिढीला संघटित करून जनमत तयार करण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. त्यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी करून परिवर्तन घडवू या, असे ते म्हणाले.