नागपूर-मुंबई विमान तिकिटाचे ‘टेकऑफ’, प्रवास भाडे पोहोचले 30 हजारांवर, विधानसभेत उमटले पडसाद

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या काळात हॉटेल व विमान पंपन्यांकडून होणाऱ्या लुटमारीचा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित झाला. विमानाच्या  तिकिटाने एकदम 29 ते 30 हजार रुपयांपर्यंत ‘टेकऑफ’ केल्याने आमदारांचे विमान एकदम जमिनीवर आले आणि ही लूट थांबवण्याची एकमुखी मागणी सभागृहात झाली.

याबाबतचा मुद्दा आज काँग्रेस आमदार अमिन पटेल यांनी सभागृहात उपस्थित केला. नागपूरमधील हॉटेल चालकांनी मिलीभगत केली आहे. नेहमीच्या काळात हॉटेलमध्ये दहा हजार रुपये एका खोलीचे भाडे असेल तर अधिवेशन काळात नागपुरातील हॉटेल्स एका खोलीसाठी 30 ते 40 किंवा 50 हजार रुपये दर आकारतात. एका प्रवासाच्या विमान तिकिटासाठी 29 ते 30 हजार रुपये दर आकारला जातो. या किमतीत तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचे तिकीट येईल. त्यामुळे हॉटेल मालक आणि विमान पंपन्यांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची मागणी अमीन पटेल यांनी केली.

काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही विमान प्रवासाच्या दराचा मुद्दा यावेळी उपस्थित केला. पूर्वी विमानाच्या तिकीट दरावर मर्यादा होती, दुपटीपेक्षा जास्त तिकीट दर आकारू नये असा नियम होता. मात्र पेंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने ही मर्यादा काढून टाकली. त्यामुळे विमान पंपन्यांना अधिवेशन काळात 20 हजार आणि त्यापेक्षाही अधिक तिकीट दर आकारतात. याबाबत आपण पेंद्र सरकारशी विमान संपर्क साधावा, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

यावर सामान्य प्रशासन विभागाने याबाबत पूर्ण माहिती घेऊन संबंधित हॉटेल आणि विमान पंपन्यांशी चर्चा करून हा प्रश्न कसा सोडवता येईल याची चर्चा करावी, असे निर्देश यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.