वृत्तपत्रात दिल्या मोठ्या जाहिराती; रामदेव बाबा, बाळकृष्ण यांनी पुन्हा मागितली माफी

योगगुरू रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडने बुधवारी पुन्हा एकदा वृत्तपत्रात मोठ्या आकाराचा माफीनामा प्रसिद्ध करत पुन्हा एकदा माफी मागितली आहे. पतंजली आयुर्वेदकडून मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या माफीनाम्यावरून न्यायालयाने रामदेवबाबा आणि बाळकृष्ण यांना फटकारले होते. हा माफीनामा जाहिरातीएवढ्या आकाराचा आहे. फक्त माफीनामा प्रसिद्ध करू नका, जाहिरातीवढ्या आकाराचा माफीनामा प्रसिद्ध करा. तसेच जाहिरातीसाठी जेवढा खर्च केला, तेवढाच माफीनाम्यासाठी केला का, असे सवाल न्यायालयाने केले होते.

न्यायालयाने फटकारल्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा माफीनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचा आकार मोठा आहे. फसव्या जाहिरातप्रकरणी न्यायालयाने रामदेव बाबा यांना माफीनामा प्रसिद्ध करण्यास सांगितले होते. रामदेवबाबा यांच्याकडून मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या माफीनाम्याचा आकार जाहिरातीपेक्षा लहान होता. त्यामुळे न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा पंतजली आयुर्वेदने मोठ्या आकारात माफीनामा प्रसिद्ध करत विना शर्त सार्वजनिक माफी असे शीर्षक त्याला दिले आहे. तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर सुरू असलेल्या सुनावणीप्रकरणी न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत पुन्हा एकदा माफीनामा प्रसिद्ध करत आहोत, असे स्पष्ट केले आहे. आमच्याकडून अशा त्रुटी राहणा नाही आणि चुकाही होणार नाही, असेही त्यात म्हटले आहे.

या प्रकरणी पुढील सुनावणी 30 एप्रिल रोजी होणार असून त्यावेळी रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना काळात पतंजीने कोरनील नावाचे औषध बाजारात आणले होते. तसेच कोविडसाठी परिणामकारक पहिले औषध अशी जाहिरात केली होती. त्याला इंडियन मेडिकल एसोशिननने आक्षेप घेत हा दावा खोटा असल्याचे म्हटले होते. रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथीवर टीकाही केली होती. तसेच फसव्या जाहिराती प्रसारीत करण्याबाबत पतंजलीविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने पतंजली आयुर्वेद आणि रामदेव बाबा, बाळकृष्ण यांना फटकारले होते.