सुरक्षा भेदून स्ट्राँगरूममधील सीसीटीव्हीत बिघाड करण्याचा प्रयत्न

बारामती लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये सीसीटीव्ही पॅमेरे बंद पडल्याची तक्रार विरोधकांनी a केली होती. त्यानंतर आज नगर मतदारसंघाच्या बाबतीतही असाच संशय पहायला मिळाला. त्रिस्तरीय सुरक्षा भेदून ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी घुसून सीसीटीव्हीमध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. मात्र, नीलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, ‘पुंपणच आता शेत खातंय, लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण प्रशासन मात्र उघडय़ा डोळ्यांनी पाहतेय,’ असा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी केला आहे.

पालकमंत्री  राधाकृष्ण विखे हे प्रशासनावर दबाव आणत आहेत की प्रशासनच झोप घेतल्याचे सोंग करत आहे?  जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमाठ हे  स्वतŠ उमेदवार असल्यासारखी भूमिका घेत आहेत. त्यामुळे या व्यक्तीच्या प्रवेशाबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न

निलेश लंके यांनी एक्सवर एका व्हिडीओसह पोस्ट करत हा आरोप केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मंगळवारी रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातय.. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघडय़ा डोळ्यांनी पाहतय, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.