व्यक्तीवेध – ‘पाणीवाल्या बाबा’ची गोष्ट

>>डॉ. ज्योती धर्माधिकारी

पाण्याचे नोबल पारितोषिक विजेते ‘पाणीवाला बाबा’ म्हणून ज्यांची ख्याती आहे असे जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह. नद्याचे पुनरुज्जीवन, संवर्धन आणि शुद्धीकरण या उपामासाठी मागदर्शन करणारे जलतज्ञ राजेंद्रसिंह नदी आपली जिवीतवाहिनी कशी आहे हे पटवून देतात. मात्र अजूनही पाण्याचे महत्त्व ओळखण्यात आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.

‘नर्मदा परामा’ हा महाराष्ट्रातील एक धार्मिक कार्पाम कित्येक वर्षांपासून परंपरेने सुरू आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वर्धा येथून ‘नदी परामा, नदीयात्रा’ हा शासकीय कार्पाम 2022 मध्ये सुरू झाला. धार्मिकतेकडून विकासाकडे असणारा हा पहिलाच कार्पाम असणार आहे. पाण्याचे नोबल पारितोषिक विजेते ‘पाणीवाला बाबा’ म्हणून ज्यांची ख्याती आहे असे जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह एकदा एका मुलाखतीत म्हणाले की, आधुनिक शिक्षण पद्धती हिंदुस्थानचे परंपरागत ज्ञान विसरली आहे. गेल्या 75 वर्षांतील पूरग्रस्त अवर्षणग्रस्त पाण्याचा तुटवडा असणारी परिस्थिती ही या आधुनिक शिक्षणाचे फलित आहे. नर्मदा परामा ते नदी परामा या महाराष्ट्र शासनाच्या कार्पामाचा विचार करताना ते पटायला लागते. ‘चला जाणू या नदीला’ या कार्पामाची सुरुवात 2022 मध्ये महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त वर्धा येथे झाली.

‘चला नदीला जाणू या’ या उपामामध्ये स्वत राजेंद्रसिंह मार्गदर्शक आणि निमंत्रित सदस्य आहेत, तर पर्यावरणाशी संबंधित असणाऱया 27 विभागांचे सचिव, दहा गैरशासकीय सल्लागार अशी ही कमिटी आहे. महाराष्ट्रातल्या एकूण 75 नद्यांचा अभ्यास करणे हा नदी परामेचा महत्त्वाचा उद्देश आहे. विशेष म्हणजे काही नद्या लुप्त झाल्या, त्याची नागरिकांना माहितीही नाही. नद्याचे पुनरुज्जीवन, संवर्धन आणि शुद्धीकरण या उपामासाठी जलतज्ञ राजेंद्रसिंह हे मार्गदर्शन करत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘नदी संवाद’ वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहे. यासंदर्भात ‘वॉटर मॅन’ राजेंद्रसिंह म्हणतात, गेल्या 75 वर्षांमध्ये नद्या बदलल्या. हिंदुस्थानने अनेक जलप्रलय आणि भयानक दुष्काळ अनुभवले. त्याचे महत्त्वाचे कारण नदी रागावलेली आहे. एका कार्पामांतर्गत नाशिक येथे झालेल्या भेटीत राजेंद्रसिंह म्हणतात, गोदावरी नदीचे आरोग्य सध्या अत्यवस्थ आहे. नुकतीच संभाजीनगरला राजेंद्रसिंह यांची धावती भेट झाली. त्या वेळी नदीमित्र असणारे विविध कार्यकर्ते राजेंद्रसिंह यांना मार्गदर्शनासाठी भेटले.

जलतज्ञ राजेंद्रसिंह असे म्हणतात की, आधुनिक शिक्षण शोषणकर्ते, प्रदूषक आणि अपामण करणारी पिढी घडवते. त्यामुळे नदीचे स्वास्थ्य दिवसेंदिवस बिघडत गेले. बाराही महिने खळखळून शुद्ध वाहणाऱया नद्या या अचानक प्रदूषणग्रस्त किंवा नाहीशा झाल्या नाहीत. शुद्ध अवस्थेत पिण्याच्या पाण्याचा जलस्रोत म्हणून नदीकडे न बघता कारखान्याला पाणी पुरवणारा जलस्रोत म्हणून बघितले गेले आणि त्याची परतफेड म्हणून कारखान्याचे सांडपाणीही नदीतच सोडले गेले. पारंपरिक हिंदुस्थानी ज्ञानामध्ये नदीकाठची गावे अत्यंत धोरणाने निर्णय घेत असत. पाण्याचा अत्यल्प वापर, पुनर्वापर आणि पुनर्भरण या गोष्टी निसर्गत होत असत. त्या परंपरेने निसर्गदेखील जपला जात होता. महाराष्ट्रातले अगदी साधे उदाहरण घ्यायचे झाले तर गोदावरी नदीचे प्रदूषण व्हायला नैसर्गिक ‘रिचार्ज सिस्टीम’ जपली नाही हे महत्त्वाचे कारण आहे. ब्रह्मगिरी पर्वताचे सीमांकन करून या पर्वताचे जैवविविधता, सर्व जल पुनर्भरण स्रोत जपणे अत्यंत गरजेचे होते. आज तरी किमान ब्रह्मगिरी जपला जावा. तेव्हाच गोदावरी जपली जाईल. प्रदूषण, अवर्षण, अतिरिक्त वापर ही सर्व कारणेही आहेतच.

परम पर्यावरणप्रेमी राजेंद्रसिंह यांचा जन्म मेरठजवळील उत्तर प्रदेशातील बागपत जिह्यातील दौला गावात झाला. वडील एक शेतकरी होते. परंपरागत जमीन आणि पाण्याचे व्यवस्थापन ते घरातूनच शिकले. त्यांनी ‘आयुर्वेदाचार्य’ ही पदवी मिळवली. सोबतच हिंदी या विषयातही पदव्युत्तर पदवी घेतली. आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून सरकारी सेवेत रुजू झाले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक आणि तरुण भारत संघ यामध्ये (यंग इंडिया असोसिएशन) कार्यकर्ते होते. पूर्णवेळ सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांनी 1984 मध्ये नोकरी सोडली आणि चार मित्रांसह राजस्थानातील दुर्गम अलवर नगर गाठले. तो दिवस होता 2 ऑक्टोबर 1985. त्यांनी गोपाळपुरा येथे प्रॅक्टिस सुरू केली, तर त्यांचे सहकारी खेडय़ापाडय़ांत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी बाहेर पडले.
अलवर जिल्हा मोठय़ा प्रमाणात कोरडा आणि नापीक होता. कारण अनेक वर्षांच्या जंगलतोड आणि खाणकामामुळे पाण्याची पातळी कमी झाली. पारंपरिक जलसंधारण तंत्र, जसे की चेक डॅम बांधणे किंवा जोहाड पद्धत पूर्णपणे बंद पडली. ग्रामस्थ आधुनिक बोअरवेलवर अवलंबून राहू लागले. त्यामुळे अफाट भूजल उपसा झाला. त्या तुलनेत पुनर्भरणाचे सर्व मार्ग बंद झाले. याच काळात त्यांना अशिक्षित मंगूलाल मीना भेटले. ते म्हणाले, “तुझ्या औषधांची आम्हाला गरज नाही, आम्हाला पाण्याची गरज आहे.” राजेंद्रसिंह यांना प्रश्न पडला, या गावाचा पाणीप्रश्न मी कसा सोडवू शकणार? तेव्हा मंगूलाल म्हणाले, “जल पुनर्भरण कसे करायचे ते मी तुला शिकवतो, तू चळवळ उभी कर.” पुढल्या तीन वर्षांमध्ये राजेंद्रसिंह यांनी लोकसहभागातून जागोजागी जोहड बंधारे बांधले, खाणकाम करणाऱयांना नोटिसा बजावल्या. खाणी शासकीय स्तरावरून बंद केल्या. त्याचे परिणाम अद्भुत असे होते. अलवर हे गाव पुन्हा सुजलाम् सुफलाम् झाले. या कार्याची नोंद फक्त हिंदुस्थानातच नव्हे, तर हिंदुस्थानच्या बाहेरही घेतली गेली. 2001चा मॅगसेसे पुरस्कार त्यांना जाहीर झाला.

दरम्यान, 2015 मध्ये पाण्याचे नोबेल समजला जाणारा ‘स्टॉकहोम जल पुरस्कार’ त्यांना मिळाला. त्यांना खरे तर अनेक पुरस्कारांनी मानद डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आले. राजेंद्रसिंह यांचा महत्त्वाचा संदेश हा प्रत्येक हिंदुस्थानी माणसापर्यंत आणि सर्व शासकीय प्रणालींपर्यंत पोहोचला जावा. ते म्हणतात, प्रत्येक गावामध्ये असलेले जलस्रोत शोधून शुद्ध पाणी आणि वापराच्या पाण्याचे जलस्रोत वेगवेगळे आहेत. ते वेगळेच ठेवून त्यांच्यावर शुद्धीकरण आणि संवर्धन या दृष्टिकोनातून लक्ष ठेवले पाहिजे. विशेष म्हणजे जालना जिह्यातल्या बदनापूर तालुक्याजवळ सुखना या एकेकाळी वैभवशाली दुथडी भरून वाहणाऱया नदीची आज दयनीय अशी अवस्था आहे. लोकसहभागातून सुखना पुनरुज्जीवनाचा कार्पाम हा स्थानिक पातळीवर घेण्यात येत आहे. राजेंद्रसिंह यांचा संदेश अशाच प्रकारे गाव माणसापर्यंत झिरपत जावा आणि हिंदुस्थान पूर्वीप्रमाणेच सुजलाम् सुफलाम् व्हावा. राजेंद्रसिंह या जल संवेदनशील कार्यकर्त्याचे मार्गदर्शन हिंदुस्थानच काय, संपूर्ण वसुंधरा हरित करू शकेल. हे ज्ञान परंपरेने दिलेले आहे. तेव्हा हिंदुस्थानी ज्ञानाचेही त्यानिमित्त पुनरुज्जीवन व्हावे हे अधोरेखित होते.

[email protected]

(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागप्रमुख आहेत.)