ऑनलाइन लॉटरी कंपनीकडून भाजपला 450 कोटींची देणगी; सांगा कशी होणार कारवाई? संजय राऊतांनी फडणवीसांना केलं लक्ष्य

सर्वोच्च न्यायालयानं इलेक्टोरल बॉण्डवरून एसबीआयला झापल्यानंतर बॉण्ड प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे. यात पक्षाला देणग्या देणाऱ्या कंपन्यांची नावे उघड झाल्यानं भाजपची चांगलीच अडचण झाली आहे. अशातच तरुण पिढीला ऑनलाइन गेमींगची नशा लागण्यावरून टिका, तक्रारी होत असताना त्यांच्यावर कारावाई का होत नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला होता. त्याचं उत्तर आता समोर आलं आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. भाजपला फंडिंग देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार तरी कशी असा सवाल राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी X वरून राज्याच्या गृहमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. यामध्ये संजय राऊत यांनी म्हटलं की, ‘दिनांक 28 फेब्रुवारी रोजी मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाराष्ट्रात सुरू असलेल्या ऑनलाईन लॉटरी जुगार खेळाची माहिती दिली. या ऑनलाईन लॉटरी जुगार अड्ड्यावर अनेक तरुण मुले उध्वस्त होत असून या जुगारात अनेक कुटुंब नष्ट झाली. पोलीस आणि मंत्रालयात मोठे हप्ते मिळत असल्याने या जुगारास सरकारी पाठबळ आहे. कारवाईची मागणी केली. फडणवीस कारवाई करतील कशी? या जुगारी कंपनीने (future gaming.. Martin lottery agency Ltd.) 450 कोटी भाजपला देणगी दिली आहे. तर ही आहे भारतीय जुगारी पार्टी?’ असा सवाल केला आहे.

चंदा दो, धंदा लो! इलेक्टोरल बॉण्डमधून निवडणूक वर्षात भाजपची तब्बल 2555 कोटी ‘वसुली’