अबब..! ठाण्यात भरवस्तीत अजगराचे दर्शन, व्हीडिओ व्हायरल

 

ठाण्याच्या लोकपुरम भागात बुधवारी रात्री भला मोठा अजगर दिसला. मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अजगर भरवस्तीत फिरताना आढळून आला. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीच्या सुमारास हा अजरगर भरवस्तीत फिसताना दिसला. येथे उपस्थित नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये अजगराला कैद केले. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

हा अजगर आढळून आला त्या भागात बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असून लोकवस्ती देखील आहे. या भागात सकाळी मॉर्निंग वॉक आणि दिवसभर रहदारी असते. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.