राहुल गांधींकडून आईला खास ’सरप्राइज’ गिफ्ट

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गोव्यातून परत येताना आपल्या आईसाठी एक खास सरप्राइज गिफ्ट आणले. राहुलने नूरी नावाचे एक पपी (कुत्र्याचे छोटे पिल्लू) गोव्यातून येताना आणले. गांधी कुटुंबात नवीन सदस्य आल्याचा एक व्हिडीओ शेअर करीत याची माहिती दिली. विमानतळावरून घराकडे जाताना राहुल गांधींनी दिल्ली मेट्रोमधून प्रवास केला. प्रवाशांसोबत चर्चा केली. नूरीला घरी आणल्यानंतर ते सोनिया गांधी यांच्याकडे दिले. हे जॅक रसेल टेरियर जातीचे पिल्लू आहे. सोनियांनी नूरीला उचलून घेत आनंद व्यक्त केला. नूरी खूप सुंदर आहे, असे सोनिया गांधींनी म्हटले. पपीला पाहिल्यानंतर सोनियांच्या चेहऱयावर आनंद ओसंडून वाहत होता. या व्हिडीओला समाजमाध्यमांवर खूप पसंत केले जात आहे.