‘रिस्क मॅनेटमेंट’ गुरु

प्रवीण धोपट

चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या राकेश झुनझुनवाला यांनी वयाच्या विशीतच म्हणजे 1980 च्या आसपास त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये फक्त पाच हजार रुपयांच्या कॅपिटलवर गुंतवणूक करायला सुरुवात केली. 2022 साली त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची संपत्ती 5.8 बिलीयन डॉलर्स इतकी होती. त्यांना ‘रिस्क मॅनेजमेंट’मधला गुरू म्हणूनही ओळखले जाते. आपली गुंतवणूक त्यांनी वेगवेगळय़ा सेक्टर आणि इंडस्ट्रीत केली होती. ‘एकाच टोपलीत सगळी अंडी ठेऊ नये,’ अशी एक म्हण आहे त्याचा ते तंतोतंत वापर करीत. त्यामुळेच ते आपले भांडवल सुरक्षित ठेवू शकले.

राकेश झुनझुनवाला यांचा ‘इंडियन वॉरन बफे’ असाही उल्लेख केला जातो. एक यशस्वी गुंतवणूकदार म्हणून त्यांचा नावलौकीक आहे. त्यांचे गुंतवणुकीमागचे तत्त्वज्ञान साधे व सोपे होते. ते फंडामेंटली चांगली कंपनी निवडत आणि त्यात दीर्घकाळ गुंतवणुकीचा मार्ग अवलंबत असत. टायटन, लुपीन,

क्रिसील या काही कंपन्या आहेत ज्यात त्यांची गुंतवणूक होती. त्यांच्या गुंतवणूक तत्त्वांना मानणारा एक मोठा वर्ग आपल्या देशात होता. तेही एखाद्या कंपनीविषयी त्यांची मते आणि त्यांचा दृष्टिकोन प्रसारमाध्यमांसमोर मोकळेपणाने मांडत. अर्थातच त्याचा परिणाम स्टॉक मार्केटमधल्या गुंतवणुकीवर होत असे. एखाद्या कंपनीची फायनांशिअल हेल्थ कशी आहे, त्या कंपनीचे भविष्यकालीन प्लॅन्स काय आहेत याचा ते आधी अभ्यास करीत आणि त्यानुसारच त्या कंपनीत गुंतवणूक करायची की नाही याचे निर्णय घेत असत. कंपनीचे फायनांशिअल स्टेटमेंट, कंपनीसाठी असलेली मार्केटमधील स्पर्धा आणि कंपनीचे मॅनेजमेंट या गोष्टी ते अगत्याने तपासत असत. याचा अर्थ अभ्यासासाठी खूप वेळ घेत असत आणि गुंतवणूकही दीर्घकाळासाठी करीत. दीर्घकाळ गुंतवणुकीमुळे वाढीबरोबरच कंपाऊंड फायदे मिळतात. त्यांना ‘रिस्क मॅनेजमेंट’मधला गुरू म्हणूनही ओळखले जाते. आपली गुंतवणूक त्यांनी वेगवेगळय़ा सेक्टर आणि इंडस्ट्रीत केली होती. ‘एकाच टोपलीत सगळी अंडी ठेवू नये,’ अशी एक म्हण आहे त्याचा ते तंतोतंत वापर करीत. त्यामुळेच ते आपले भांडवल सुरक्षित ठेवू शकले. त्यांना आपल्या निष्कर्षांवर प्रचंड विश्वास असे. कारण त्यांचे संशोधन, अभ्यास आणि विश्लेषण सखोल असे. त्यामुळेच एकदा निर्णय घेतला की त्यावर ते ठाम असत.

सामाजिक भानही जपले 

राकेश झुनझुनवाला यांची केवळ संपत्ती निर्माण करणारी व्यक्ती इतकीच ओळख नव्हती तर त्यांनी आपल्या कमाईतला मोठा हिस्सा सामाजिक कामासाठी दानही करीत असत. राकेश झुनझुनवाला यांनी कधीच एक्सेस लिव्हरेज घेतले नाही. हातात असलेल्या कॅपिटलवरच ते गुंतवणूक करीत. आयुष्यभर त्यांनी व्यावसायिक पारदर्शकता जपली आणि आपल्या चांगल्या तत्त्वांना चिकटून राहिले, त्यामुळेच त्यांचे नाव आपल्या स्टॉक मार्केटमध्ये आदराने घेतले जाते.

(लेखक, दीपंकर फिनकॅप इन्व्हेस्टमेंट प्रा. लि येथे गुंतवणूक सल्लागार आहेत.)