रत्नागिरी सेक्स रॅकेट प्रकरणात आणखी नऊ आरोपींना अटक

रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर परिसरामधील एका इमारतीच्या तळ मजल्यावरील भाड्याच्या फ्लॅट मध्ये छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणात एका महिलेसह आणखी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

सेक्स रॅकेट मधील दोन्ही पिडीत महिलांची यातून सुटका करण्यात आली व त्यांना महिला आधार गृह येथे ठेवण्यात आले तसेच रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे यातील आरोपी राजेंद्र रमाकांत चव्हाण, वय 45, रा. मिरजोळे जांभूळफाटा, रत्नागिरी यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली तसेच गुन्हा रजिस्टर नंबर 243/2023 भा.दं.वि.सं. कलम 370 व अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक रत्नागिरी, धनंजय कुलकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी विभाग विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी कल्पकतेने करून या गुन्ह्या मध्ये आरोपी राजेंद्र रमाकांत चव्हाण व एका महिलेसह खालील नमूद अन्य 8 आरोपींना अटक केली आहे.त्यामध्ये अब्दुल मतीन हसनमियाँ डोंगरकर, वय 36, ओमकार जगदीश बोरकर, वय 26,, समीर मंगेश लिबुकर, वय 23,अरबाज अस्लम चाउस, साई प्रसाद साळुंखे, रोहन मंगेश कोळेकर, प्रविण प्रकाश परब यातील 1 ते 4 आरोपी यांना न्यायालयाने दि. 31/07/2023 रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे तसेच या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.