Video – आला आला… अखेर चंद्रावर ‘प्रज्ञान’ रोव्हर उतरतानाचा व्हिडीओ इस्रोकडून ट्विट

‘चांद्रयान-3’च्या यशस्वी लँडिंगनंतर सहाचाकी आणि 26 किलो वजनाचे प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणे सुरू केले आहे. जवळपास 14 तासांनंतर गुरुवारी सकाळी ‘हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्था’ (इस्रो) ने रोव्हर लँडरमधून बाहेर आल्याची माहिती ‘एक्स’वरून दिली. त्यानंतर आता प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरवरून बाहेर पडतानाचा व्हिडीओ इस्रोनं जारी केला आहे.

याआधी इनस्पेसचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी रात्री उशिरा प्रज्ञान रोव्हर रॅम्पमधून बाहेर निघतानाचा फोटो शेअर केला होता. मात्र आता त्याचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात रोव्हर अगदी सावकाश आणि सहज चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्याचं दिसत आहे.

माझी तुझ्यावर नजर आहे! ‘चांद्रयान-2’च्या ऑर्बिटरने काढले विक्रम लँडरचे फोटो, इस्त्रोने दिली माहिती