1984 शीख दंगल प्रकरण – काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता

1984 च्या शीख दंगलीशी संबंधित दिल्लीतील सुल्तानपुरीतील तीन जणांच्या हत्येप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांची बुधवारी राऊज एव्हेन्यू न्यायालयाने तब्बल 13 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली. 1984 च्या शीख दंगलीत सुल्तानपुरी परिसरात तीन लोकांची हत्या करण्यात आली होती. सज्जन कुमार हे जमावाला भडकावत होते, असा आरोप दंगलीतील सीबीआयचा एक महत्त्वाचा साक्षीदार चाम कौरने केला होता. यानंतर कोर्टाने दोषी ठरवून सज्जन कुमारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

शीख दंगलीसंबंधित जनकपुरी आणि विकासपुरीमध्ये शीख हत्याप्रकरणी राऊज एव्हेन्यू न्यायालयाने सज्जन कुमार यांच्या विरुद्ध आरोप निश्चित केले होते, परंतु नंतर 302 कलम हटवले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने 17 डिसेंबर 2018 ला सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.