शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे अडीच लाख कोटी बुडाले

शेअर बाजारात आज बुधवारी जोरदार आपटी बार पाहायला मिळाला. सेन्सेक्समध्ये 800 अंकांची घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना तब्बल अडीच लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1.18 टक्क्यांच्या घसरणीसह 66800 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 213.90 अंकांनी घसरून 19,901 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी फक्त 7 कंपन्यांचे शेअर तेजीत दिसले. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल बुधवारी 320.66 लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले. एकूण बाजार भांडवल सोमवारी, 323 लाख कोटी रुपये होते. आजच्या घसरणीमुळे कंपन्यांचे बाजार भांडवल जवळपास 2.34 कोटी रुपयांनी कमी झाले. विप्रो, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक आणि आयसीआयसीआय बँकांचे शेअर्स कोसळले.