मिंधे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात

मिंधे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीमध्ये अपघात झाला. दिल्लीतील बी.डी. रोडवर हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. या अपघातामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत गोडसे हे एमएस 15 एफसी 9909 या इनोव्हाने प्रवास करत होते. बी.डी. रोडवर एका कारला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या अर्टिगा (क्र. 7, सीडब्ल्यू 2202) या कारने गोडसे यांच्या गाडीला धडक दिली. यात कारचे नुकसान झाले आहे.