लोकशाहीला धक्का पोहोचवणाऱ्या शक्तीविरोधात उभे राहा; शिक्षक मेळाव्यात ज. मो. अभ्यंकर यांचे आवाहन

देशात राज्यघटनेत बदल करण्याच्या दिशेने पावले टाकली जात असून लोकशाहीला धक्का पोहोचविणाऱ्या केंद्रातील शक्तीविरोधात उभे रहा, असे आवाहन राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी केले. गोरेगावच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित शिक्षक संवाद मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात दिंडोशी गोरेगाव- जोगेश्वरी-अंधेरी परिसरातील 300 हून अधिक शिक्षक उपस्थित होते.

सत्ताधारी पक्ष जातीधर्माचे राजकारण करून लोकशाही मोडकळीस आणण्याचे प्रयत्न करीत आहे. शिक्षकांनी या परिस्थितीत लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकरसारख्या लोकशाहीची चाड असलेल्या उमेदवारास आणि सोबतच महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणा, असे आवाहन अभ्यंकर यांनी केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गोरेगाव विधानसभा संघटक समीर देसाई यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस प्रकाश शेळके, उपाध्यक्ष सलीम शेख, राज्य समन्वयक नितीन चौधरी, विधी सल्लागार मच्छिंद्र खरात, मुंबई विभाग अध्यक्ष अजित चव्हाण, महिला आघाडी अध्यक्षा  मानसी चाळके, महिला मुंबई समन्वयक  शबाना ठाकूर, कोषाध्यक्ष भरत म्हात्रे, सरचिटणीस मुरलीधर मोरे, संजय धुरी, संतोष ताम्हणकर, पश्चिम मुंबई विभागाचे अध्यक्ष हितेंद्र चौधरी, संतोष शेलार, विजय सिंह, नितीन परीट, मंगेश पवार, प्रमोद बगले, रत्नकांत पवार, अमरुद्दीन सोलकर, मुश्ताक खान, सुरेंद्र रायबोले, दिलीप पुंडकर,  मुनाफ शहापुरे  आदी उपस्थित होते.