चांद्रयान 3 मोहीम यशस्वी होण्यासाठी साईबाबांना साकडे; द्वारकामाईसमोर साईभक्तांनी केली सामुहीक आरती

चांद्रयान 3 मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी शिर्डीतील द्वारकामाई मंदिरासमोर ग्रामस्थ आणि साईभक्तांनी सामुहीक आरती केली.अंध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टींची सांगड घातल्यास संशोधन नक्की यशस्वी होते, अशी भावना ठेवून ग्रामस्थ आणि साईभक्तांनी एकत्र येत चांद्रयान मोहीमेच्या यशासाठी सामुहीक प्रार्थना केली आहे. यावेळी भारत माता की जय , साईनाथ महाराज की जय !! अशा घोषणांनी साई मंदिर परिसर दुमदूमून गेला होता.