कॅनडात आणखी एका खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या

कॅनडामध्ये आणखी एका खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या करण्यात आली आहे. सुखविंदर सिंग उर्फ सुख्खा दुनुके याची हत्या करण्यात आली आहे. कॅनडातील पिनीपेगमध्ये त्यांची हत्या करण्यात आली आहे. सुख्खा हिंदुस्थानातून फरार झाला होता. सुख्खा खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप सिंग उर्फ अर्श डाला याचा खास माणूस होता. हरदीप सिंग निज्जर या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमागे हिंदुस्थानचा हात असल्याचा आरोप करत कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी खळबळ उडवून दिली आहे. हिंदुस्थानने यावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली असून हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. ट्रूडो यांच्या आरोपांनंतर दोन्ही देशात तणावाचे वातावरण आहे.