महायुतीत माढ्याचा गुंता सुटता सुटेना, रणजितसिंह निंबाळकरांना रामराजेंचा विरोध कायम

madha-lok-sabha-constituency

Lok Sabha Election 2024: माढा लोकसभेच्या उमेदवारीवरून महायुतीत निर्माण झालेला गुंता सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समजूत काढूनही अजित पवार गटाचे रामराजे यांचा विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला असलेला विरोध कायम आहे. यामुळे भाजपपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधातील धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या बंडाला सुरुवातीच्या काळात रामराजे निंबाळकरांनी खतपाणी घातले. त्यानंतर मोहिते-पाटील यांनी तुतारी हाती घेतली. रामराजे आणि मोहिते-पाटील गटाचा माढा मतदारसंघातील तालुक्यांत मोठा प्रभाव आहे. आजवर बऱयाच निवडणुकांत ते दिसून आले आहे. रामराजे आणि रणजितसिंह यांच्यात कायम संघर्षच राहिला आहे. महायुती म्हणून भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट एकत्र आले तरी या दोन्ही नेत्यांमधील वैर काही कमी झालेले नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, रामराजे यांचे भाऊ रघुनाथराजे यांनी धैर्यशील मोहिते-पाटलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.