आम्ही मरतामरता वाचलो! अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही ज्या विमानानं प्रवास करत होती त्याचे इनर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. रश्मिकाने स्वत: सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. यामुळे चाहते चिंतेत आहे. मात्र तिला कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळतेय.

रश्मिका मंदाना विमानाने मुंबईहून हैदराबादला निघाली होती. मात्र उड्डाणानंतर विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला. हजारो फूट उंचीवर असताना विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हे विमान पुन्हा मुंबई विमानतळाकडे वळवण्यात आले आणि धावपट्टीवर सुखरूप उतरवण्यात आले. या इमर्जन्सी लँडिंगमुळे विमानातील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसली तरी सर्वांना धक्का मात्र बसला आहे.

विमान प्रवासादरम्यान घडलेल्या या घटनेबाबत रश्मिकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून स्टोरी शेअर केली आहे. रश्मिकासोबत अभिनेत्री श्रद्धा दासही याच विमानाने प्रवास करत होती. तिच्यासोबतचा एक सेल्फी रश्मिकाने इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोखाली तिने ‘फक्त तुमच्या माहिती साठी सागते की आज आम्ही मरतामारता वाचलो’, अशी ओळही लिहिली आहे. तसेच लाफ्टरचे दोन इमोजीही टाकले आहेत.

दरम्यान, रश्मिकाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाले तर ती नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘एनिमल’ या चित्रपटात यांच्यासोबत झळकली होती. रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरीसोबत तिने मोठा पडदा शेअर केला होता. या चित्रपटने तिकीटबारीवर चांगली कमाई केली. यासह रश्मिकाचा अल्लू अर्जुनसोबतचा ‘पुष्पा-2’ हा चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होईल. तसेच ‘रेनबो’ आणि ‘द गर्लफ्रेंड’ या तेलुगू/तमिळ व ‘छावा’ या हिंदी चित्रपटाही ती दिसणार आहे.