रत्नागिरीत कोरोनाचे तीन रुग्ण; व्हेरियंटच्या तपासणीसाठी नमुने पुण्याला रवाना

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळल्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. या तीन रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले असून तपासणी अहवाल आल्यानंतरच जेएनवन व्हेरियंट आहे की नाही ते स्पष्ट होणार आहे. या तीन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची कोरोना तपासणी सुरु आहे. त्यांचेही तपासणी अहवाल गुरुवारी मिळणार आहेत.

रत्नागिरी, तोणदे, राजीवडा आणि कसोप येथे तीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. या तिघांनाही जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षात दाखल करण्यात आले आहे. या तीन रुग्णांमध्ये जेएनवन व्हेरियंट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिघांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच जेएनवन व्हेरियंट आहे की नाही हे समजणार आहे. सध्या त्या तीन रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्याना लवकरच गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. या तीन जणांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचेही अहवाल गुरुवारपर्यंत येतील.